उन्हाळ्यात कोकम सरबत पिण्याचे गुणकारी फायदे
ऑनलाईन कोकम ज्यूस खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
वाघोली टाईम्स : मार्च महिन्याच्या सुरुवातीला उन्हाची दाहकता हळूहळू वाढू लागल्याने शरीराला पाण्याची सतत गरज भासत असते. त्यामुळे शरीराची दाहकता कमी करण्यासाठी अनेकजण कोल्ड्रिंक्स पिण्यासाठी उत्साही असतात. असे असले तरी कोल्ड्रिंक्स आपल्या शरीरासाठी हानिकारक असते. कोल्ड्रिंक्सला पर्याय म्हणून घरगुती पेयांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात पिण्यासाठी घरगुती पेयामध्ये लिंबाचे सरबत, वाळ्याचे सरबत, कोकमचे सरबत शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. लिंबू सरबत अत्यंत सोपे आणि सर्वांच्याच पसंतीचे पेय असले तरी कोकमच्या सरबत पिण्यासही तितकीच पसंती दिली जाते. वजन कमी करण्यामध्ये देखील कोकमचे सरबत गुणकारी ठरत असते. कोकमच्या फळामध्ये व्हिटामिन सी, सायट्रिक अॅसिडयासोबतच अनेक पोषकतत्वे असतात. यामुळे इम्युनिटी सिस्टीम मजबूत होते. कोकमच्या फळात आढळणारे अँटीऑक्सिडंट्स सूज कमी करण्यात मदत करतात. याशिवाय तुम्हाला हेल्दी बनवतात. कोकमामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. तसेच कॅलरीजचे प्रमाण कमी असते. कोकमामध्ये कोलेस्ट्रॉल आणि सॅच्युरेटेड फॅट्स अजिबात नसते. कोकममध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि मँगनीज असते. ज्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. ब्लड प्रेशरही नियंत्रणात राहतो. पित्त विकारावर अतिशय गुणकारी असं औषधी फळ आहे ते म्हणजे कोकणातील रातांबा ऊर्फ कोकम
शरीराच्या उष्णतेला थंडावा देणारे एक रसदार कोकमचे फळ हे कोकणासह प्रामुख्याने गोवा आणि गुजरात येथे आढळते देते. या फळांची साले सुकवून ठेवली जातात. चिंचेप्रमाणे आंबट असणाऱ्या कोकमाचा वापर डाळ, भाजीमध्ये प्रामुख्याने केला जातो. रातांब्यापासून बनवलेले कोकम सरबत हे गुणांनी आणि चवीनेही अतिशय मधुर असते. आता सुरू होणा-या उष्ण दिवसांमध्ये हे सरबत जरूर प्यावे.
कोकम सरबत बनवण्यासाठी लागणारे साहित्य साहित्य (१ ग्लास साठी) :
कोकम सिरप – १ टेबलस्पून
थंड पाणी – साधारण २०० मिली (म्हणजे एका ग्लासात राहील इतके)
चिमूटभर – शेंदेलोण/सैंधव मीठ किंवा पादेलोण किंवा साधे मीठ
लहान भाजलेल्या जीऱ्याची पूड – १/४ टिस्पून किंवा चवीनुसार
पिठीसाखर – आवश्यकतेनुसार (गरज असल्यास, कोकमांच्या आंबटपणावर अवलंबून आहे.)
पुदिना पाने – सजावटीसाठी (ऐच्छिक)
बर्फाचे तुकडे किंवा चुरा- आवश्यकतेनुसार
कृती : एका काचेच्या ग्लासमध्ये कोकम सिरप, थंड पाणी, मीठ, जिरेपूड, पिठीसाखर घालून चांगले मिक्स करावे. पुदीना पाने तोडून घालावी. बर्फाचे तुकडे घातले की सरबत पिण्यास तयार.