महिला दिनाचे औचित्य साधून सबंध स्त्रीवर्गास पुरुषाचे अनावृत्त पत्र

                हे स्री..सादर प्रणाम…🙏🙏

तुझ्याविषयी आदर व्यक्त करुन तुझी माफी मागायचं तुच्छ धाडस मी या ठिकाणी करु पाहत आहे.. अभय असावं..

              मी तुझा अपराधी आहे…न जाणो कित्येक पिढ्यांचा..! या ना त्या निमित्ताने तुझी छळवणूक करत आलोय..पण तू मात्र निःस्वार्थपणे मला मायेच्या पदरानं आणि निस्सीम प्रेमाच्या ओलाव्याने पाठीशी घालत आलीस…कामाच्या ठिकाणी, शाळेत, घरात, बाजारात, कुठे कुठे तुझा उपमर्द केला नाही म्हणून सांगू..?

             तुला केवळ भोगाची वस्तू म्हणून पाहत आलोय..हे कधी समर्थनीय नव्हतचं..तुझं रुप नाही पाहिलं, वय नाही पाहिलं, नातं नाही पाहिलं, इतकचं काय तुझं समाजातील स्थान ही नाही पाहिलं…फक्त तुझ्यावर बळजबरी करत गेलो..कधी शारीरिक, कधी मानसिक तर कधी सामाजिक..!

                फुलं सुगंधी असतात.. आपण फक्त सुगंध हुंगावा.. जीवन सुगंधित करावं.. पण माझ्या स्वार्थीपणाने तर कळसं गाठला.. मी फुलचं काय कळ्याही तोडत गेलो.. नाजूक, निष्पाप, मनोहारी कळ्या चुरगाळत गेलो..

             मी विध्वंसक नाही.. पण माझ्यातला राक्षस जागा झाला कि मला त्याला आवरता आलं नाही.. त्याने तर माझ्या अस्तित्वाला छेद दिलाय.. त्याला दोष देऊन मी माझी मान सोडवू ईच्छित नाही.. खरा गुन्हेगार तर मीच..!

              तुझं समाजातील मानाचे स्थान मान्य करून मी तुझ्या कर्तबगारी पुढे नतमस्तक होऊ ईच्छितो.. तुलाही स्वतःच्या भावभावना असतात.. स्वप्न असतात.. आशा असतात.. आकांक्षा असतात.. तुलाही गरुडझेप घ्यायची असते.. आयुष्य मनमुरादपणे जगायचं असतं..

                मी आता तुला बंधनात ठेवू ईच्छित नाही.. तुझं स्वतःच वेगळं अस्तित्व असताना तुझ्या प्रगतीआड येण्याचा मला काहीएक अधिकार नाही… तु जशी मला आधार देतेस.. पाठिंबा देतेस… संकटात सोबत खंबीरपणे ऊभी राहतेस.. तसा मीही राहू ईच्छितो.. मला तुझ्या पंखांच बळ होऊ दे.. आयुष्यात प्रत्येक वळणावर तुझा हात हातात घेऊ दे..

           जमलचं कधी तर माफीच्या नजरेने मला पाहून घे…. माझे अपराधच इतके भयंकर आहेत की.. युगानुयुगे माझ्यावरच्या खटल्यांचा निकाल लागायचा नाही… लागला तरी तो मरेपर्यंत फाशी असेल किंबहुना त्याहीपेक्षा क्रुर शिक्षा कोणती असेल तर त्या शिक्षेचा एकमेव हकदार मी असेन..

                आज महिलादिनी तुला साष्टांग दंडवत घालून मी स्त्री-स्वातंत्र्याचा पुनरुच्चार करतो.. मानवाबरोबरचा तुझा बरोबरीचा हक्क बिनशर्त मान्य करतो.. सरतेशेवटी तुझ्या जगण्याला स्फूर्तीच्या, उमेदीच्या शुभेच्छा अर्पण करुन माझ्या पत्राचा शेवट करतो..

कळावे,

आपलाच …”पुरुष”

© लेखक – नामदेव सुखदेव गवळी, वाघोली

9767041875, namdevgavali1@gmail.com

Please follow and like us:

4 comments

  • Nicely written,but these sentiments arise only during women’s day, infact it should be norm of everyday

    • Namdev Sukhdev Gavali

      संवेदनशीलता आणि सद्सद्विवेकबुद्धी जाग्रुत ठेवून वागल्यास वर्षाचे 365 दिवस आपण महिलादिन साजरा करु शकतो..ह्याची सुरुवात खरं तर मायक्रो लेवल पासून व्हायला हवी..मग हा अविष्कार अशक्य नाही..🙏🙏

  • Excellent interpretation of emotions. To be observed/followed throughout the Year/Life

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *